Ladki Bhaeen Yojana 6th Installment : राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. उर्वरित महिलांच्या बँक खात्यावरती सहावा हप्ता जमा झालेला आहे. या कोणत्या महिला आहेत त्यांच्या खात्यावरती किती रक्कम जमा झाली हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत.Ladki Bhaeen Yojana 6th Installment
राज्यातील महायुती सरकारने महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यावरती दर महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत जमा केली जाते. हि मदत महिलांच्या खात्यावरती डीबीटी अंतर्गत थेट जमा करण्यात येते. ही मदत मिळवण्यासाठी महिलांना त्यांचे बँक आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे.
राज्यात या योजनेमध्ये जवळपास 2.50 कोटी हून अधिक महिला लाभार्थ्याती आहेत. परंतु अनेक अशा महिला आहेत त्यांच्या खात्यावरती अद्याप लाभ जमा झाला नव्हता. सव्वा हप्ता महिलांना 25 डिसेंबर रोजी वितरित करण्यास सुरुवात झालेली होती. परंतु 15 लाख लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नव्हते. त्यांना आता पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे. महत्वाचे कारण म्हणजे महिलांचे आधार कार्ड बँक खाते लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा झाली नव्हती.
महायुती सरकारने सरकार स्थापन केल्यानंतर महिलांना प्रतीक्षा लागली होती की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील 15 लाख 3880 महिलांच्या खात्यावरती 225 कोटी 58 लाख वीस हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत.
यामुळे महिलांना त्यांची आर्थिक अडचणी सोडवता येणार आहे. त्यांच्या आरोग्याबाबत खबरदारी घेता येणार आहे, आणि याशिवाय इतर छोट्या मोठ्या गोष्टी देखील त्यांना सोडवताना मदत होणार आहे.
या आधी महिलांच्या खात्यावरती पाच हप्ते यशस्वीरित्या जमा करण्यात आले होते. आचारसंहितामुळे ही योजना काही काळ थांबवली होती. परंतु महायुती सरकारने सरकार स्थापन केल्यानंतर ही योजना पुन्हा सुरू केलेली आहे. परंतु आता या अर्जाची छाननी करून काहीतरी दुरुस्ती करून ही योजना पूर्णपणे पारदक्षता करण्याचा उद्दिष्ट शासनाचा असल्याचा सांगितले जात आहे.
परंतु निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने सरसकट महिलांच्या खात्यावरती हा लाभ जमा केलेला आहे. त्यामुळे महिलांचे टेन्शन वाढत चाललेले आहे. अर्ज तपासणी होणार असल्याने अनेक महिला यामधून अपात्र ठरणार आहेत त्यामुळे त्यांना यापुढे पंधराशे रुपयांचा लाभ मिळणार का नाही याबाबत महिलांची दाखदुख वाढत चाललेली आहे.
नाशिक जिल्ह्यातील 15 लाख 3880 महिलांच्या खात्यावरती डिसेंबर चा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. महिलांच्या खात्यावरती एक हजार पाचशे रुपये प्रमाणे 6 वा हप्ता जमा झालेला आहे. परंतु अद्याप एक विषय रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यावरती कधी जमा होणार त्याचे आदेश अद्याप शासनाकडून प्राप्त झालेले नाहीत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.