शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार ₹2000 हजार रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan 19th installment update : भारत सरकार अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी अनेक लोक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. आपला देश प्रगतीपथावर असला तरी अद्याप शेतकऱ्यांना मोठी तडतड करावी लागत आहे. देशभरामध्ये अनेक गरीब शेतकरी आहेत, त्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी भारत सरकारने पंतप्रधान किसन सन्मान योजना सुरू केली. ही योजना 2019 मध्ये मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पामध्ये सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत या योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 18 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. आता शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याची आतुरता लागलेली आहे, हा हप्ता कधी जमा होणार याची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. PM Kisan 19th installment update

PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षासाठी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत एकत्रित शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत नाही, दर चार महिन्याच्या अंतरावरती तीन हप्ते प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयाचा एक हप्ता जमा केला जातो. असे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आत्तापर्यंत 18 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. आता 19 वा हप्ता कधी जमा होणार याची आतुरता शेतकऱ्याला लागले आहे.

बँकेला आधार कार्ड लिंक करणे गरजेचे It is necessary to link Aadhaar card to the bank.

  • शेतकरी मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की शासन अंतर्गत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी (Direct Benefit Transfer) अंतर्गत थेट जमा करण्यात येते. ही मदत मिळवण्यासाठी तुम्हाला च्या बँक खात्याला आधार लिंक असणे गरजेचे आहे, तरच तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात येते.

पीएम किसान योजनेचा 19 व हप्ता कधी मिळणार When will the 19th installment of PM Kisan Yojana be available?

  • शेतकरी मित्रांनो, या योजनेच्या नियमाप्रमाणे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, 18वा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी जमा करण्यात आलेला आहेत. म्हणजे आता चार महिन्यांच्या अंतरावरती हा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणे अपेक्षित आहे. प्रसारमाध्यमांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकतो. शासन अंतर्गत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, त्यामुळे शेतकरी मित्रांनी अशा कुठल्याही अफवेला बळी पडू नये.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत 13 कोटी हुन अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी अंतर्गत थेट जमा करण्यात येते. ही योजना शेतकऱ्यांसाठी एक वरदानकारक ठरली आहे. त्यामुळे या योजनेची लोकप्रियता शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.

Leave a Comment